जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वॉटर अँड पॉवर कंसल्टंसीच्या माजी सीएमडी राजेंद्र कुमार यांच्या घरावर सीबीआयनं (CBI) छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई २ मे रोजी करण्यत आली. यामध्ये काही कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत.
CBI raided places in around 19 locations including Delhi, Chandigarh, Panchkula, Gurugram, Sonipat & Ghaziabad in connection with disproportionate assets case against Rajender Kumar Gupta, former CMD of WAPCOS water & power consultancy which comes under Jal Shakti ministry. CBI… pic.twitter.com/4y635hUdaB
— ANI (@ANI) May 2, 2023
(हेही वाचा – ATS Police Action : पोलीस कारवाईच्या भीतीने पाचव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यु)
राजेंद्र कुमार यांच्या दिल्ली, चंदीगड, गुरूग्राम, गाजियाबादमधील १९ ठिकाणांवर सीबीआयने (CBI) छापे टाकले आहे. या कारवाईदरम्यान तब्बल २० कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यात रोख रक्कम, कागदपत्रे, डिजिटल उपकरणे यांचा समावेश आहे.
हेही पहा –
सीबीआयने सांगितले ..
राजेंद्र कुमार गुप्ता यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात रोख रकमेच्या (CBI) व्यतिरिक्त मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे तसेच मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. सीबीआयच्या छाप्यातील रकमेचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.
छापेमारीत सापडलेले २० कोटी रूपये हे गुप्ता यांच्या घरातच सापडले (CBI) आहेत. सुटकेस आणि बेडमध्ये रक्कम ठेवल्याचे फोटोंमधून दिसत आहे. सीबीआयने सांगितले की, ही रक्कम गुप्ता यांच्याकडे कुठून आली याची चौकशी सुरु आहे.
Join Our WhatsApp Community