सीबीएसई बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बोर्डाने परिपत्रक जाहीर करत यासंदर्भात माहिती दिली. दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी दरम्यान होणार आहे. तर बारावीच्या परीक्षा या १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
( हेही वाचा : IRCTC कडून प्रवाशांना भन्नाट ऑफर! फिरायला जाताना ६०० रुपयांपासून बुक करा सुंदर हॉटेल्स)
वेळापत्रक डाऊनलोड कसे कराल?
-
- वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- दहावी-बारावी परीक्षा शेड्युल २०२३ वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला दहावी-बारावी परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ दिसतील.
- पीडीएफ डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी प्रिंट काढावी.
CBSE Class 10 & 12 exams to start from February 15, 2023 pic.twitter.com/KuFmdVfnHi
— ANI (@ANI) December 29, 2022
प्रात्यक्षिक परीक्षा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE)इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परिक्षा २ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्या परीक्षेची तारीख बदलून दिलेल्या कालावधीत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचेही सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले.
Join Our WhatsApp Community