CBSE 12th Result 2022: CBSE बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

CBSE 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लाखो विद्यार्थी बराच काळ या निकालाची वाट पाहत होते. सर्व विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा result.cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता. या वेबसाइट्सवर विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून सहज आपला निकाल तपासू शकतात. येथे तुमची संपूर्ण मार्कशीट दिसेल, खाली डाउनलोड पर्यायदेखील दिसेल, तिथे क्लिक करुन तुम्ही तुमची मार्कशीट डाउनलोड करु शकता.

सीबीएसई बारावी बोर्डाचा एकूण निकाल हा 92.71 टक्के लागला असून, महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के आहे. देशभरातून यावर्षी 14 लाख 44 हजार 341 विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे दिसते आहे. परीक्षेत 94.54 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.25 टक्के आहे.

( हेही वाचा: आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, मी लगेच राजीनामा देतो; सुहास कांदेंचे आव्हान )

असा तपासा निकाल

  • CBSE निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in आणि cbseresults.nic.in व्यतिरिक्त, विद्यार्थी UMANG अॅप, डिजीलाॅकर आणि एसएमएसद्वारेदेखील तपासू शकतात.
  • विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbseresult.nic.in ला भेट देऊ शकतात.
  • यानंतर CBSE 10 वी/ 12 वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा नोंदणी क्रमांक टाका.
  • यानंतर 10 वी आणि 12 वी 2022 चा निकाल लिंकवर स्क्रीनवर दिसेल.
  • विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
  • शेवटी निकालाची प्रिंट काढा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here