महाराष्ट्रातील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी, १२ एप्रिल रोजी वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १४ एप्रिल रोजी, बुधवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत चर्चा करून सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून १२वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
१ जूनला परिस्थितीचा आढावा घेऊन १२ वीची परीक्षा घेणार!
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये परीक्षा घेण्याच्या शक्यतेविषयी प्रस्ताव एक आराखडाआधी पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला. गेल्यावर्षीप्रमाणे ऑनलाइन परीक्षांचा मुद्दाही यामध्ये होता. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आणि हा निर्णय घेतला. १ जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता १२वी च्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा : १०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! कधी होणार परीक्षा? वाचा…)
१०वीचा निकाल असा लावणार!
इयत्ता १०वीचा निकाल हा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने लावण्यात येणार आहे. बोर्डाने ही पद्धत विकसित केली आहे. जे विद्यार्थी या पद्धतीने मिळालेल्या गुणांच्या आधारे समाधानी नसतील ते जेव्हा परिस्थतीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यात येईल, तेव्हा लेखी परीक्षेला बसता येणार आहे.