केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE Board Exam 2024) १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. काही पेपरमधील बदलांबरोबरच सीबीएसईने सुधारित वेळापत्रक देखील जारी केले आहे. जे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाकडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला बसणार आहेत ते सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सुधारित वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
(हेही वाचा – भाजपाच्या जडणघडणीत प्रमुख सहभाग असणारे Murali Manohar Joshi)
सुधारित वेळापत्रक –
सीबीएसई बोर्डाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दहावीच्या (CBSE Board Exam 2024) तिबेटी विषयाचा पेपर, जो पूर्वी ४ मार्च २०२४ रोजी होणार होता, तो आता २३ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. याशिवाय किरकोळ विषयाचा पेपर यापूर्वी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार होता, जो आता २६ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येईल.
(हेही वाचा – Accident : मिरवणुकीमुळे चालक झाला विचलित; दोघांना चिरडले)
त्याचप्रमाणे, १२ वीचा फॅशन स्टडीजचा पेपर, जो पूर्वी ११ मार्च २०२४ रोजी होणार होता, (CBSE Board Exam 2024) तो आता २१ मार्च २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
१०वी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान –
तसेच सुधारित वेळापत्रकानुसार, (CBSE Board Exam 2024) इयत्ता १०वी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ ते १३ मार्च २०२४ दरम्यान तर इयत्ता १२ वी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान घेण्यात येतील. सीबीएसईच्या या cbse.gov.in अधिकृत वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना सुधारित वेळापत्रक मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community