केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही वर्गाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरु होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक अपलोड करण्यात आलेले आहे. पुरवणी परीक्षा १५ ते २२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे वाचन वेळ दिला जाईल. बोर्डाच्या वाचनाच्या वेळेत, विद्यार्थी प्रश्नपत्रिका नीट वाचू आणि समजून घेऊ शकतात. यावरून त्यांना किती प्रश्न माहित आहेत आणि प्रत्येक विभागासाठी किती वेळ लागेल याची कल्पना येईल. (CBSE)
(हेही वाचा – शेतकरी महायुती सरकारला पावसाळी अधिवेशनात बाय बाय करणार; विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांची टीका)
परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होईल. परंतु भारतीय संगीत, चित्रकला, व्यावसायिक कला, कथ्थक-नृत्य, भरतनाट्यम-नृत्य, ओडिसी-नृत्य, योग, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांची परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सादर केली गेली आहेत तेच विद्यार्थी पुरवणी परीक्षाला बसू शकतील. जे विद्यार्थी २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षेत नियमितपणे बसले होते आणि त्यांना कंपार्टमेंट श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा शाळेशी संपर्क साधावा लागणार आहे. (CBSE)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community