आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दि. २० मार्च रोजी सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षापासून सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
( हेही वाचा : दिशा सालियन प्रकरणावर Aditya Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया)
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उत्तर दिले. प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने (Steering Committee) मान्यता दिली आहे का? त्याला उत्तर देताना भुसे (Dada Bhuse) म्हणाले की, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिलपासून नवीन सत्राची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या या विषयीच्या चर्चेला उत्तर मिळाले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community