केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसई (CBSE Result) बोर्डाने इयत्ता १० आणि १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. इयत्ता १२ वीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. परीक्षेत यंदा ८७.९८ (CBSE Result 87.98) टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. जर तु्म्हाला निकाल बघायचा असेल तर cbse.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तेथे तुमचा रोल नंबर टाकून रिझल्ट पाहू शकता. इयत्ता बारावीचा निकाल लागल्याने आणि घवघवीत यश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (CBSE Result 2024)
मुलींनीच मारली बाजी
यावर्षी मुलांच्या तुलनेत जास्त मुली पास झाल्या आहेत. मुलींची टक्केवारी ९१ टक्के आहे जी मुलांच्या तुलनेत ६.४० टक्के जास्त आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ऐन रणधुमाळीत धुळ्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का; प्रदेश सरचिटणीसाचा भाजपामध्ये प्रवेश)
सीबीएसई बोर्ड रिझल्ट २०२४
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थींनीची टक्केवारी – ९१.५२%
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी – ८५.१२%
उत्तीर्ण झालेल्या ट्रान्सजेंडरची टक्केवारी – ५०.००%
(हेही वाचा – Rahul Dravid : राहुल द्रविड प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार की नाही?)
CBSE बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर, असा करा चेक
स्टेप १ : निकाल जाहीर झाल्यानंतर, CBSE results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप २: होम पेज वर, CBSE 12th Result Direct Link’ या लिंक वर क्लिक करा.
स्टेप ३: लॉग इन पेज ओपन होईल, तिथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
स्टेप ४: तुमचा CBSE बोर्डाचा निकाल स्क्रीनवर ओपन होईल, तो नीट तपासा.
स्टेप ५: विद्यार्थी या साईटवरून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करून सोबत ठेवू शकतात. (CBSE Result 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community