CBSE बोर्ड दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेणार

34
CBSE बोर्ड दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेणार
CBSE बोर्ड दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमावलीच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. सर्व भागधारक ९ मार्चपर्यंत मसुद्यावर आपला अभिप्राय देऊ शकतात. यानंतर धोरण अंतिम केले जाईल. मसुद्याच्या नियमांनुसार, परीक्षेचा पहिला टप्पा दि. १७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान चालेल, तर दुसरा टप्पा ५ मे ते २० मे दरम्यान चालेल.

( हेही वाचा : Kurla Bus Accident मधील ३ मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत

दरम्यान दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करताना परीक्षा शुल्क एकत्रित आकारले जाईल. गेल्या आठवड्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी, शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाच्या सचिव व इतर शिक्षणतज्ज्ञांशी वर्षातून दोनदा बोर्ड परिक्षा घेण्याबाबत चर्चा केली होती. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी सीबीएसई, एनसीईआरटी (NCERT) , केव्हीएस (KVS ), एनव्हीएस (NVS) आणि अनेक शालेय अधिकाऱ्यांशी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

तसेच सीबीएसईच्या (CBSE) परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे सर्वेाच्च गुण अंतिम मानले जातील, हे २०२६-२७ पासून लागू होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना तीन पर्याय असू शकतात. एक म्हणजे वर्षातून एकदा परीक्षा द्या. दुसरं दोन परीक्षा द्या आणि तिसरा पर्याय म्हणजे जर तुम्ही एखाद्या विषयात चांगली कामगिरी केली नाही, तर तुम्हाला दुसऱ्या परीक्षेत तो विषय पुन्हा द्यावा लागेल. ही प्रणाली लागू झाल्यास पुरवणी परीक्षा होणार नाही. विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा परीक्षेला बसण्याचा किंवा दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय असेल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.