CC Road : मनमाला टँक रोडच्या सिमेंटीकरणाने घेतला झाडाचा बळी

झाड उन्मळून पडल्याने इमारतीचे नुकसान

139
CC Road : मनमाला टँक रोडच्या सिमेंटीकरणाने घेतला झाडाचा बळी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये पदपथावर असलेल्या झाडांची पाळेमुळेही कापली जात असल्यामुळे अनेक झाडांचे आयुर्मान कमी होत आहे. या रस्ते खोदकामात झाडांना धक्का पोहोचू शकतो अशी भीती पाली हिलमधील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेनमधील रहिवाशांनी व्यक्त केलेली असतानाच शुक्रवारी माटुंगा पश्चिम येथील मनमाला टॅक रोड अर्थात जे. के. सावंतमधील मार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामात एक झाड चक्क इमारतीवर पडून संरक्षक भिंतीसह इमारतींच्या ग्रीलचे नुकसान झाले आहे. (CC Road)

(हेही वाचा – नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास)

माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडचे सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून या कामासाठी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. या रस्ते खोदकामामध्ये स्टार सिटी सिनेमागृहाशेजारील आशियाना इमारती शेजारी पदपथावर असलेल्या झाडांची मुळेही तोडून टाकण्यात आली. त्यामुळे हे झाड कमकुवत बनले. या खोदकामामुळे झाडाचा तोल एका बाजुला कलंडला गेला आणि येथील इमारतीवर जावून हे कोसळले. या झाडांच्या बुध्यांमुळे इमारतीची संरक्षक भिंत तुटली आणि फांद्यांमध्ये इमारतीमधील खिडक्यांच्या ग्रीलही तुटल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या इमारतीवर हे झाड कोसळले आहे, त्या इमारतीतील एका रहिवाशाच्या घरी विवाह सोहळानिमित्त शुक्रवारी हळदीच्या कार्यक्रम असल्याने मंडप घालण्यात आला होता, या मंडपाचेही प्रचंड नुकसान झाले. तसेच त्यांच्या घराच्या खिडक्यांचे ग्रील तुटल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. (CC Road)

(हेही वाचा – Mumbai International Airport वर ९ कोटींचे सोने आणि हिरे जप्त)

या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून हे झाड बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यात कुठलीही मनुष्यहानी झाली नसली तरी इमारतीच्या संरक्षक भिंतीसह इमारतींच्या खिडक्यांचे ग्रील तुटले गेलेले आहे. मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष संतोष साळी यांनी प्रकरणी रस्ते कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करताना आसपास असलेल्या झाडांची काळजी घेणे गरजेच आहे. परंतु कंत्राटदारांची माणसे झाडांची पाळेमुळे तोडून खोदकाम करत आहे, ज्यात या रस्त्यांच्या लगत असलेली झाडांना धोका पोहोचत असले. त्यामुळे या झाडांचा बळी हा संबंधित रस्ते कंत्राटदार कंपनीने घेतला असल्याने झाड मारण्यासंदर्भातील ज्याप्रकारे कारवाई इतरांवर केली जाते, त्याचप्रकारे या संबंधित रस्ते कंत्राटदारावर केली जावी अशी मागणी साळी यांनी केली आहे. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.