मुंबई महापालिका प्रशासनाकडून आता रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना चाप लावण्याचा प्रयत्न केला जात असून तब्बल दोन वर्षांपूर्वी दादरमधील ज्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, त्याच रस्त्यावर तडे जाऊन तब्बल पंधरा ते वीस वर्षांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम झाले असावे अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे तडे गेलेल्या रस्त्याचे बांधकाम कधी बनले जाणार असा प्रश्न आता दादरकरांकडून उपस्थित केला जात आहे. (CC Road)
दादर पश्चिम येथील सेनापती बापट चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडे जाणाऱ्या समर्थ व्यायाम मंदिर मार्गाचे सिमेंटीकरण करण्याचे काम मागील दोन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे, हा मार्ग केळुस्कर मार्ग दक्षिण आणि राऊत मार्ग यांना छेदून जात आहे. पूर्वी हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा होता. परंतु हा रस्ता जुन झाल्याने यावर मोठ्याप्रमाणात भेगा पडल्या होत्या. (CC Road)
(हेही वाचा – शिवाजीपार्कच्या त्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे काम तोडून पुन्हा बनवण्यास सुरुवात)
त्यामुळे पूर्वीचा रस्ता तोडून नव्याने रस्ता बनवण्यात आला. परंतु रस्ता बनवल्याने पहिल्याच पावसाळ्यात यावर तडे पडल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबतची वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मॅनहोल्सच्या परिसरातील भाग तोडून नवीन बांधकाम करण्यात आले. परंतु त्यानंतरही अनेक भागांमध्ये तडे दिसून आल्यानंतर या रस्त्यांच्या बांधकामाची तपासणी करण्याच्या दृष्टीकोनातून सॅम्पल टेस्ट घेण्यात आली. त्यात रस्त्यावरील हे तडे वरील भागांत नसून खालच्या भागापर्यंत पसरल्याचे अहवालात दिसून आले. त्यामुळे या रस्त्यांचे बांधकाम तोडून नवीन बांधणे आवश्यकअ असल्याचे मतही तज्ज्ञांनी नोंदवले आहे. (CC Road)
परंतु आजवर वाहतूक पोलिस परवानगी देत नाही तसेच या रस्त्याचे पुन्हा बांधकाम केल्यास या परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण होईल अशी कारणे देत तडे गेलेल्या या रस्त्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सेनापती बापट चौकापासून ते शिवाजी पार्क प्रवेशद्वार आदी परिसरात हे तडे गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आरे कॉलनीतील मुख्य रस्त्यांच्या निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून ज्याप्रकारे पुन्हा खराब झालेला भाग पुन्हा करून घेतला जाणार आहे, तसा समर्थ व्यायाम मंदिर मार्गही पुन्हा बांधून घेतला जाणार आहे का असा सवाल जनतेकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांखालून विविध सेवांकरता वाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे युटीलिटीजच्या सेवांसाठी रस्त्याखाली चांगले बांधकाम झालेले असताना प्रत्यक्षात पृष्ठभाग खराब झाल्याने या रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community