CC Road : रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणासाठी वापरले जाणारे रेडीमिक्स अयोग्य; अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीतच आले समोर

626
CC Road : रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणासाठी वापरले जाणारे रेडीमिक्स अयोग्य; अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीतच आले समोर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटच्या (CC Road) कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रेडीमिक्स काँक्रिटबाबत तक्रारी येत असतानाच अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनासच ही बाब समोर आली आहे. बांगर यांनी रस्‍ते पाहणी दौऱ्यादरम्‍यान, मानखुर्द – आगरवाडी गाव येथील कै. नितू मांडके मार्ग कॉंक्रिटीकरण कार्यस्‍थळी स्लंप टेस्‍ट घेतली. पण अपेक्षेप्रमाणे परिणाम (रिजल्ट) न आल्याने कॉंक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण (लोड) त्यांनी नाकारले आणि ‘आरएमसी’ वाहन माघारी पाठवले. त्यानंतर त्यांनी नवीन मिश्रण मागवून काँक्रिटीकरणाला सुरुवात केली. परंतु अशाप्रकारे रेडीमिक्सचे मिश्रण आढळून आल्याने यापूर्वी झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये अयोग्य सिमेंट काँक्रिटचे मिक्स वापरले गेल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. (CC Road)

मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरण (CC Road) कामे मध्यावस्थेत आहेत. या अंतर्गत मानखुर्द – आगरवाडी गाव येथील कै. नितू मांडके मार्ग आणि चेंबूर येथील महर्षी दयानंद सरस्वती मार्ग काँक्रिटीकरण कामाची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी २० मार्च २०२५ रोजी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन केली. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे प्राध्‍यापक पी. वेदगिरी, सहायक प्राध्‍यापक सोलोमन डिब्बार्ती, महानगरपालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, रस्ते व वाहतूक विभागाचे उपप्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) संजय सोनवणे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (CC Road)

(हेही वाचा – Boxing in Olympics : लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धाची वापसी; ऑलिम्पिक समितीची मान्यता)

काँक्रीटच्‍या कार्यवहन क्षमतेसाठी (वर्क एबिलीटी) ‘स्लंप टेस्‍ट’ करण्‍यात येते. याचा उपयोग काँक्रीटमध्‍ये सिमेंट व पाण्‍याचे प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी केला जातो. रस्‍ते बांधणी कामात ‘स्‍लम्‍प टेस्‍ट’ ला अन्‍यन्‍यसाधारण महत्त्व आहे. त्‍यामुळे काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्‍पस्‍थळ (आरएमसी प्‍लांट) आणि प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळ (ऑन फिल्‍ड) या दोन्‍ही ठिकाणी ‘स्‍लम्‍प टेस्‍ट’ बंधनकारक केली आहे. रस्‍ते पाहणी दौऱ्यादरम्‍यान, मानखुर्द – आगरवाडी गाव येथील कै. नितू मांडके मार्ग कॉंक्रिटीकरण कार्यस्‍थळी स्लंप टेस्‍ट करण्‍यात आली. अपेक्षेप्रमाणे परिणाम (रिजल्ट) न आल्याने कॉंक्रिटीकरणासाठी (CC Road) आलेले मिश्रण (लोड) नाकारत ‘आरएमसी’ वाहन माघारी पाठविण्यात आले. या प्रकरणी कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेकडून (क्‍यू. एम. ए.) खुलासा मागवून सक्‍त कारवाई करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. (CC Road)

या प्रकरणी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) च्‍या प्राध्‍यापकांचा सल्‍ला घेण्‍यात आला. रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्‍पस्‍थळ (आरएमसी प्‍लांट) ते प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळ या दरम्‍यान मिक्‍सर वाहन येईपर्यंत ३० ते ९० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. या वाहतूक कालावधीचा विचार करता कंत्राटदारांनी ३ काँक्रीटमिक्‍स डिझाईन बनवून घ्‍याव्‍यात. आरएमसी प्‍लांटवरून वाहन निघून ते कार्यस्‍थळी पोहोचण्‍याचा कालावधी ‘गुगल’ वर तपासून घ्‍यावा आणि त्‍या आधारावर कोणते काँक्रीटमिक्‍स डिझाईन वापरावे, याची निश्चिती करावी, जेणेकरून प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळावर येईपर्यंत काँक्रीटची (CC Road) गुणवत्‍ता राखली जाईल. याबाबतचे सविस्‍तर परिपत्रक जारी करावे असे निर्देश बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. विक्रोळी येथील ‘गोदरेज’ आवारात ‘प्री कास्ट’ पद्धतीद्वारे काँक्रिट रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. या रस्त्याची देखील बांगर यांनी पाहणी केली. प्रायोगिक तत्त्वावर ‘प्री कास्ट’ पद्धतीचा अवलंब करून महानगरपालिकेला रस्ता बांधणी करणे शक्य आहे का, याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या तज्‍ज्ञांसमवेत चर्चा करून कार्यपद्धती निश्चित करण्‍याचे निर्देश बांगर यांनी दिले. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.