-
सचिन धानजी, मुंबई
रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाशिवाय (CC Road) पर्याय नाही. यामध्ये उष्णता वाढत असेल, काही प्रमाणात आजूबाजूच्या झाडांना हानी पोहोचत असेल, तरीही रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रस्त्याचा दर्जा चांगला ठेवला तर वाहतुकीचा दर्जा चांगला राहिल आणि वाहतुकीचा दर्जा चांगला राहिला तर आपली जीवनशैली चांगली राहिल, हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे काँक्रिटीकरणाचा पर्याय हा उपलब्ध पर्यायांपैंकी सर्वात चांगला पर्याय म्हणून निवडण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी दादरमधील अमरहिंद मंडळाच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत बोलतांना सिमेंट काँक्रिटीकरणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. (CC Road)
(हेही वाचा – काँग्रेसचे आंदोलन बेगडी, मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही; Raosaheb Danve यांचे टीकास्त्र)
मुंबईत सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे जोरात सुरु असून याबाबत मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना डॉ. गगराणी यांनी मुंबईमध्ये जवळपास २२०० कि. मी लांबीचे रस्ते आहे. त्यातील १५०० किमी रस्त्याचे काम करायचे आहे. पूर्वीच्या काळामध्ये जवळपास २५० कि. मी लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम झाले होते. पावसाळ्यात आपल्याला नेहमीची रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निर्माण होते. खड्डे पडण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यात कमी कालावधीमध्ये होणारा जास्त पाऊस हेही एक कारण आहे. म्हणजे तीनच महिन्यांमध्ये जवळपास अडीच ते तीन हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. ऐतिहासिकदृष्ट्या जर बघितले तर मुंबई शहर आणि उपनगरे याचा यातील ४० टक्के भाग समुद्राचा आहे. मुंबई समुद्रात बांधली आहे. समुद्रापेक्षा खोल असणाऱ्या भागात ही मुंबई उभी केलेली आहे. एकूण मुंबईच्या ४० टक्के भाग हा मुंबईत समुद्रात भराव टाकून तयार केलेला आहे. हा नैसर्गिक भूभाग, समुद्रात भराव टाकून उभे केलेला आहे. दक्षिण मुंबईतील काही रस्ते काही वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण झाले होते. पण त्याचा दर्जा खूपच चांगला आहे आणि टिकून आहे. पण मुंबई सर्वच रस्ते करत नाही आहे. महापालिका नऊ मीटर पेक्षा जास्त असणारे रस्तेच करतो. ज्या छोट्या गल्ल्या, कॉलनीमधील रस्ते आहेत किंवा ज्या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला सिमेंट काँक्रिटीकरण करू नका, असे रस्ते वगळले आहेत, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. (CC Road)
(हेही वाचा – ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करा! शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची मागणी; बंगालमधील हिंदूंवर अत्याचाराचा आरोप)
मुंबई शहरामध्ये ज्याला आपण चालण्यायोग्य जागा अशा कमी आहेत. शहराचे नियोजन करत असताना रस्त्याचे नियोजन करण्यात आले. पण मुंबई शहर जे जुने शहर आहे ते मुंबई शहर आणि त्यानंतर ज्या काही ठिकाणी नगर नियोजन (टाऊन प्लॅनिंग) योजनेमध्ये जी क्षेत्र विकसित झाली. ती क्षेत्र सोडली तर फार मोठया प्रमाणामध्ये चालण्यायोग्य अशी पदपथ मुंबईमध्ये कमी प्रमाणात आहेत. मागील तीन ते चार वर्षांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु असल्यामुळे जे पदपथ उपलब्ध आहेत, त्यावरही या कामांचा परिणाम झालेला आहे, ही वस्तूस्थिती आहे. ही कामे ज्यावेळी काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण होतील, त्यावेळी या पदपथ पूर्वव्रत होतील आणि अधिक चांगले होती. हे जरी असले तरी पुढचे दोन ते तीन वर्षे हा त्रास मुंबईकांना बऱ्याच ठिकाणी सहन करावा लागणार आहे. कारण तो काँक्रिटीकरणाच्या कामांचा अविभाज्य भाग असल्याचे गगराणी यांनी सांगितले. सध्या मुंबईतील रस्त्यावर खड्डे पडलेले नाही, तर खोदलेले नाही, खड्डयांची संख्या आता खूपच कमी झालेली आहे. याचा अर्थ हे रस्ते फार दर्जेदार आहेत, असा आपला दावा नाही. पण ते दर्जेदार होण्याकडे वाटचाल सुरु आहे. खड्ड्यांपेक्षा खणलेल्या रस्त्यांचा प्रश्न अधिक आहे. आणि येत्या ३१ मे पर्यंत सर्वतोपरी पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. मुंबई हे एवढे दाटीवाटीने वसलेले शहर आहे, प्रत्येक रस्त्याखालील सेवा सुविधांचे जाळे (युटीलिटीज) आहे. त्या सर्व सेवांच्या वाहिनी बदल्याव्या लागता, त्यात सुधारणा कराव्या लागतात, असेही नमुद केले. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community