आता रेशन दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे; काळाबाजार रोखणार

157

सार्वजनिक वितरण प्रणालीमधील (पीडीएस) काळाबाजार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी शिफारस अन्न व ग्राहक व्यवहार तथा सार्वजनिक वितरणविषयक संसदी स्थायी समितीने केली आहे. पीडीएस ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकाची व्यवस्था दुरुस्त करण्याची शिफारसही समितीने जारी केली आहे.

संसदीय स्थायी समितीने 19 जुलै रोजी आपल्या अहवाल संसदेला सादर केला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी समितीने केल्या आहेत.

काय आहे अहवालात?

अहवालात म्हटले आहे की, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांतील धान्य भांडारावर संयुक्त निरीक्षण व्यवस्था, तसेच सार्वजनिक वितरण विभागात गुणवत्ता नियंत्रण शाखा सुरु करण्यात आलेली असतानाही धान्य खराब असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांसाठी आल्या आहेत. काही दलालांचे हे काम असू शकते. हे लोक चांगले धान्य स्वस्त धान्य दुकानांऐवजी अन्यत्र विकतात आणि गरिबांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळते.

( हेही वाचा: पोलीस बळी देत नाही, तर गटारी अमावस्या सण म्हणून साजरा होतो! ‘त्या’ परिपत्रकावर पोलीस नाराज )

तक्रारीसाठी काय?

सर्व राज्यांत तक्रारींसाठी 1967 आणि 1800 हे फोन क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या क्रमांकांना राज्य सरकारांनी मजबूत करायला हवे, असे अहवालात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.