Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन

133
Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन
Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होईल, अशआ पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन, नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत आणि उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी केले आहे.

यंदा गणेशोत्सवात नाशिकसह देशभरात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवात मूर्ती दानाची संकल्पना पहिल्यांदाच नाशिक महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यामातून सुरू करण्यात आली. ही संकल्पना आज देशभरात राबवली जात आहे, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांनी पर्यावरणाबाबत जागरूक राहून या चळवळीत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Epidemics Increased : गणेशोत्सवाच्या तोंडावर साथीचे आजार वाढले, पालिकेकडून तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन)

याबाबत उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी सांगितले की, सार्वजनिक स्तरावर सण साजरे करताना जनसमुदायात नवचैतन्य असावे. काही वेळा मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवांमुळे निसर्गाची हानी होते, प्रदूषण पसरते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सणाच्या वेळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सूचनांची अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे पर्यावरणविषयक विविध कायद्यांमध्ये जनतेचा सहभाग असणे आवश्यक आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.