Celebrity School : शाळांमध्ये ‘सेलिब्रिटी स्कूल’ उपक्रम राबविणार; दीपक केसरकरांची माहिती

गायन, नृत्य, अभिनय, छायाचित्रण, फिटनेस, संभाषण कौशल्य, चित्रपट दिग्दर्शन, पाककला आदी १८ कलागुणांचा समावेश असलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, शान नवाजुद्दीन सिद्दीकी, मेरी कॉम, मधुर भांडारकर, विकास खन्ना, गणेश आचार्य हे मान्यवर विद्यर्थ्यांना ऑनलाईन कलागुणांचे धडे देतील.

260
Celebrity School : शाळांमध्ये 'सेलिब्रिटी स्कूल' उपक्रम राबविणार; दीपक केसरकरांची माहिती

शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेलिब्रेटी स्कूल’ (Celebrity School) हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध १८ कलागुणांशी संबंनधत मान्यवर्णकडून ऑनलाईन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शुक्रवारी (०९ फेब्रुवारी) दिली. (Celebrity School)

गायन, नृत्य, अभिनय, छायाचित्रण, फिटनेस, संभाषण कौशल्य, चित्रपट दिग्दर्शन, पाककला आदी १८ कलागुणांचा समावेश असलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, शान नवाजुद्दीन सिद्दीकी, मेरी कॉम, मधुर भांडारकर, विकास खन्ना, गणेश आचार्य हे मान्यवर विद्यर्थ्यांना ऑनलाईन कलागुणांचे धडे देतील. राज्यातील ६५ हजार शाळांमधील ४९ लाख विद्यार्थी यात सहभागी होतील. (Celebrity School)

ऑनलाईन, व्हिडीओ प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्या स्पर्धकांना सेलिब्रेटींची भेट घडवून आणली जाईल. या विद्यार्थ्यांना सेलिब्रेटींशी संवाद साधता येईल. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ होणार असून पुढील एक वर्ष हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. (Celebrity School)

(हेही वाचा – छत्रपतींच्या घरात भांडणे लावण्याचा Mahavikas Aghadi चा प्रयत्न?)

राज्याचे मराठी भाषण धोरण येत्या आठवड्याभरात जाहीर करणार – केसरकर 

आठवड्यातून सलग सहा दिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताण हलका करण्यासाठी आनंदी शनिवार ही संकल्पना शाळांमध्ये राबविण्यता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शनिवारच्या दिवशी अर्धा-एक तास त्यांच्या आवडीचे वाचन, गायन, नृत्य, संगीत, कृषी, स्काउटगाईड यात सहभागी होता येईल, असेही केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (Celebrity School)

दरम्यान, राज्यातील शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवावेत, असा निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे. हा निर्णय सर्व माध्यमाच्या आणि सर्व मंडळाच्या शाळांना लागू असेल. ज्या शाळा हा निर्णय मान्य करणार नाहीत, त्या शाळांचे परवाने नूतनीकरण करून दिले जाणार नाहीत, असा इशारा केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिला. राज्याचे मराठी भाषण धोरण येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (Celebrity School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.