- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (Cement concrete road) करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात सन २०२१-२२मध्ये तत्कालिन नगरसेवकांच्य शिफारशींनी हाती घेतलेल्या रस्त्यांचे सिमेंटीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. सांताक्रुझ पूर्व (SantaCruz East) येथील वाकोला पाईप रोडवरील दत्त मंदिर रोड ते एअरपोर्ट बॉऊड्रीपर्यंतच्या रस्ते सिमेंटीकरणाचे काम आजही अर्धवट आहे. पाईप लाईनवरील झोपड्या तथा बांधकाम यांचे परिशिष्ट दोन न बनल्याने त्यांच्यासह फेरीवाल्यांकडून होणारा विरोध यामुळे या रस्त्यांचे काम रखडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या रखडलेल्या कामांमुळे दत्तमंदिर चौकात मोठा खड्डा निर्माण झाला असून याची दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराकडून महापालिका करून घेत नाही की महापालिका स्वत: खड्डा बुजवत नाही. त्यामुळे वाकोलाकरांना या ख.ड्डयांतून जावे लागत आहे. (Cement concrete road)
सांताक्रुझ पूर्व (SantaCruz East) येथील वाकोला जंक्शनपासून सुरु होणाऱ्या आणि गावदेवीपर्यंत जाणाऱ्या वाकोला पाईप लाईनवर राहणाऱ्या रहिवाशांना अर्थवट राहिलेले रस्त्यांचे बांधकाम, अनधिकृत वाहन पार्किंग (Unauthorized Vehicle Parking), अनधिकृत गॅरेज (Unauthorized Garage) यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाकोला पाईप लाईन रस्त्यांचे दत्त मंदिर रोड जंक्शन ते एअरपोर्ट बाऊड्रीपर्यंतच्या भागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या रस्त्यांचे सिमेंटीकरण इंडियन वॉटर वर्क असोशिएशन कार्यालय तसेच टनेलच्या ठिकाणापासून सुरु केले आहे. परंतु काही फेरीवाले आणि जलवाहिनीच्या परिसरातील काही बांधकामांनी रोखल्याने या सिमेंटीकरणाच्या कामाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. (Cement concrete road)
(हेही वाचा- Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल!; शेखर मुंदडा यांचे प्रतिपादन)
या रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून रस्त्या लगत ढापा ड्रेनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ड्रेनचे काम अर्धवट असतानाच काही भागांमध्ये रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पहायला मिळत आहे. या रस्त्याचे जिथे प्रारंभ होत आहे, तेथील रस्त्यांचा वापर वाहतुकीसाठी योग्यप्रकारे व्हावा या दृष्टीकोनातून संबंधित कंत्राटदाराने संबंधित रस्ता खुला करून द्यायला हवा. परंतु दत्त मंदिर जंक्शनला या रस्त्या शेजारी मोठ्याप्रमाणात खड्डा निर्माण होऊन त्यात पाणी साचले जाते, तसेच त्या खड्डयांतून सिमेंटीकरण केलेल्या रस्त्यांवर जाताना मोठे दिव्य पार करावे लागते. (Cement concrete road)
अनधिकृत रिक्षा आणि ओला व परमिट असलेल्या खासगी वाहने रस्त्याच्या कडेला उभे राहतात. या रीक्षा आणि चारचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात असून त्यामुळे मोठ्याप्रमाणात या रस्त्यावर चिखल होत असून यामुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त आहेत. (Cement concrete road)
(हेही वाचा- Damage Banganga Lake : कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस आणि नोंदवला एफआयआर)
वाकोला पाईप लाईन, दत्त मंदिर रोड तसेच गावदेवी रोड याठिकाणी रिक्षा अनधिकृत उभ्या केल्या जात असून यासाठी काही मंडळी पैसे घेऊन रिक्षा उभ्या करण्यास परवानगी दिली जात असते. त्यामुळे या अनधिकृत रिक्षा पार्किंगमुळे खासगी व्यक्ती पैसे कमवत असल्याने यापेक्षा महापालिकेने याठिकाणी अधिकृत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास त्यातून महापालिकेचा महसूल वाढू शकतो,असे रहिवाशांचे म्हणणे आहे. (Cement concrete road)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community