ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नौपाड़ा वाहतूक उपविभाग हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांचेकडून अल्मेडा चौक येथील उड्डाणपुलाच्या अॅप्रोचचे युटीडब्ल्यूटी पध्दतीने सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. याकरीता अल्मेडा उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून सदरची वाहतूक ही उड्डानपुलाच्या समांतर खालून वळविण्यात येणार आहे. सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होवू नये वाहतुक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
असे असणार वाहतूकीतील बदल
प्रवेश बंद
अल्मेडा चौक उड्डाणपूल खोपट सिग्नलकडून एल.बी.एस. रोड तीन पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवेश खोपट सिग्नल उड्डाणपूल चढणी येथे बंद करण्यात येत आहे.
असा असणार पर्यायी मार्ग
खोपट सिग्नलकडून एल. बी. एस. रोड तीन पेट्रोल पंपाकडे जाणारी वाहने अल्मेडा चौक उड्डाणपुलाच्या समांतर खालच्या दिशेने वळविण्यात येत असून ही वाहने पुढे इच्छित स्थळी जाऊ शकतात.
प्रवेश बंद
अल्मेडा चौक उड्डाणपूल तीन पेट्रोल पंप एल. बी. एस. रोडकडून खोपट सिग्नलकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवेश उड्डाणपूल चढणी येथे बंद करण्यात येत आहे.
असा असणार पर्यायी मार्ग
तीन पेट्रोल पंप एल.बी.एस. रोडकडून खोपट सिग्नलकडे जाणारी वाहने अल्मेडा चौक उड्डाणपुलाचे समांतर खालून वळविण्यात येत असून ही वाहने पुढे इच्छीत स्थळी पोहोचू शकतील. ही वाहतूक अधिसूचना उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असल्याचे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community