Cemetery : मालाडमधील प्राण्यांची दहनवाहिनी २ डिसेंबर २०२४ पासून तीन आठवडे बंद

114
Cemetery : मालाडमधील प्राण्यांची दहनवाहिनी २ डिसेंबर २०२४ पासून तीन आठवडे बंद
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये (Cemetery) लहान आकाराच्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी करण्यात आलेली सुविधा ही देखभालीची कामे करण्याच्या उद्देशाने २ डिसेंबर २०२४ पासून पुढील तीन आठवडे तात्पुरती बंद राहणार आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

(हेही वाचा – Raigad पालकमंत्र्याचा वाद नव्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!)

सुमारे ५० किलो वजनापेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये (Cemetery) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking ही लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Waqf Board ला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय अवघ्या एका दिवसांत केला रद्द)

या लिंकवर नोंदणी करुन, निवडलेल्या विहित वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये (Cemetery) मृत प्राण्याचे अंत्यविधी करता येतात. परंतु या दहनवाहिनीच्या देखभाल कामासाठी २ डिसेंबर २०२४ पासून पुढील तीन आठवड्यांच्या कालावधीदरम्यान ही सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पूर्ववतपणे सुरू करण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण यांनी प्रशासनाच्या वतीने कळवले आहे.

(हेही वाचा – Prithvi Shaw : ट्रोलिंगमुळे कंटाळलेला पृथ्वी म्हणतो, ‘मी कुणाचं काय वाईट केलंय?’)

आंबोली स्मशानभूमी तात्पुरती बंद

मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागातील अंबोली हिंदू स्मशानभूमीतील (Cemetery) दहनकक्ष दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवारी १ डिसेंबर २०२४ पासून बंद राहील. दुरूस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तोवर, वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत देखील पारंपरिक दाहिनीचा पर्याय उपलब्ध असेल असे महापालिकेने कळविले आहे. मात्र, अंबोली स्मशानभूमीत असणारी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असेल असेही महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.