Dahanu-Nashik railway मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्राची मंजुरी

330
Central Railway च्या दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी ९६ फेऱ्या

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) नाशिक आणि डहाणूला (Nashik to Dahanu railway line) जोडणाऱ्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मान्यता दिली आहे. डहाणू रोडवरून वाणगावमार्गे त्र्यंबकेश्वर असा नाशिक ते डहाणू या दोन प्रमुख शहरांना जोडणारा १०० किलोमीटरचा नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्याची  योजना मध्य रेल्वेने आखली. या रेल्वेमार्गाने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाविकांना थेट रेल्वेने त्र्यंबकेश्वर, पंचवटीपर्यंत पोहचता येणार आहे.   (Dahanu-Nashik railway line)

या ब्रॉडगेज नाशिक-डहाणू रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण २.५ कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंचवटी (Panchavati parisar) परिसर आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक नाशिकला भेट देतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे. हा नवीन रेल्वेमार्ग डेक्कन पठार ते डहाणू येथील वाढवण बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटीदेखील तयार करेल.

(हेही वाचा – Muslim : मुसलमान तरुणाने हवाई सुंदरीचा केला विनयभंग )

विशेषतः नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतमाल वाढवण बंदरापर्यंत पोहचणे अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतमालासह सर्व प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांच्या आयात निर्यातीस चालना मिळून राज्याच्या आर्थिक विकासात मोठी भर पडणार आहे. त्याचबरोबर नाशिक वाढवण पोर्ट बीजी रेल्वे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि जव्हार, मोखाडा या महत्त्वाकांक्षी पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्याला सामाजिक आर्थिक लाभ वाढविण्याकरिता जोडले जाऊन या भागाचा अधिक विकास यामुळे होणार आहे.

(हेही वाचा –Vande Bharat Sleeper Train: रेल्वेमंत्र्यांनी दाखवले ट्रेनचे पहिले मॉडेल; म्हणाले… ) 

नाशिक-वाढवण पोर्ट रेल्वे मार्गास मंजुरी मिळाल्यानंतर कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड ड्राय पोर्ट देखील मुंबई जेएनपीटीसोबतच (JNPT) वाढवण पोर्टशी जोडला जाणे आवश्यक आहे. त्यामुळे निफाड ड्रायपोर्टचा वाढवण पोर्ट नियोजनात समावेश करून घेण्यासाठी मागणी केली जात आहे. (Dahanu-Nashik railway line)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.