आता बनावट हेल्मेट, प्रेशर कुकर विकणा-यांवर कारवाई, सरकारचा निर्णय

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने  बनावट घरगुती वापराच्या उत्पादनांच्या विक्री विरोधात मोहीम तीव्र केली आहे. प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि बनावट ‘आयएसआय मार्क’ असलेले स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्यांविरोधात जनहितार्थ ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे ग्राहक संरक्षण नियामकाने बुधवारी सांगितले. सीसीपीएने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना आधीच नोटीस बजावली आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई

आम्ही केवळ ऑफलाइन बाजारातच नव्हे, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही बनावट उत्पादने विकणाऱ्यांविरुद्ध पाळत ठेवत आहोत, असे खरे म्हणाले. प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि एलपीजी सिलेंडर या आम्ही तीन उत्पादनांची ओळख पटवली आहे. या तीन बनावट वस्तू विकणा-या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे खरे यांनी स्पष्ट केले आहे. 

बनावट मालाची जिल्हास्तरावर चौकशी 

बाजारपेठांमध्ये  अशा बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी सीसीपीएने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या आहेत त्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात ही चौकशी करतील आणि येत्या दोन महिन्यांत याबाबत अहवाल देतील, असे खरे पुढे म्हणाले. याशिवाय, बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी सीसीपीए वैयक्तिकरित्या सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत आहे, असे खरे म्हणाले. आमचे लक्ष विशेषतः या तीन उत्पादनांवर आहे. अशी प्रकरणे समोर आल्यास आम्ही खटला भरू.

BIS चिन्हांकित वस्तू खरेदी करण्याचा सल्ला

खरे यांनी सर्व ग्राहकांना ही उत्पादने खरेदी करताना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी BIS चे भारतीय मानक (IS) चिन्ह तपासण्याचे आवाहन केले. प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि एलपीजी सिलिंडरची ‘आयएस’ चिन्हाशिवाय विक्री करता येणार नाही, याची ग्राहकांनी जाणीव ठेवावी ,असे खरे पुढे म्हणाले. उदाहरणार्थ ग्राहकांनी हेल्मेटवर बीआयएस मार्क ‘IS 4151:2015’ आणि प्रेशर कुकरवर ‘IS 2347:2017’ चिन्ह पहावे. असं खरे यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे.

 (हेही वाचा :बापरे! 10 लग्न, 100 प्रेयसी अन् बरचं काही…अखेर गजाआड! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here