मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड धिम्या मार्गावर, तर हार्बरच्या पनवेल-वाशी मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

central and harbour line mega block on 26 February, Sunday
मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड धिम्या मार्गावर, तर हार्बरच्या पनवेल-वाशी मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी माटुंगा ते मुलुंड या दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल, असे मध्य रेल्वेने कळवले आहे.

तसेच ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक

  • हार्बर रेल्वेच्या बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्ग वगळून पनवेल- वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंतच्या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
  • पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील, असे रेल्वेने कळवले आहे.
  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करिता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील, असेही रेल्वेने कळवले आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागात विशेष लोकल धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील असे रेल्वेने म्हटले आहे.

(हेही वाचा – मुंबईतील बहुचर्चित ४०० किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांपैकी ५२ किलो मीटर लांबीच्या कामांना रविवारपासून प्रारंभ)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here