भारतात खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर कारवाई करण्यात आली असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे. या यूट्यूब चॅनेल्सचे जवळपास ३३ लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि या चॅनेल्सच्या व्हिडिओमधील बहुतेक सर्व माहिती खोटी असल्याचे आढळून आले आहे.
( हेही वाचा : TV Channel Rates Increase: आता TV पाहणे महागणार! )
भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बॅन केलेली ही युट्यूब चॅनेल्स सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश, सरकारी योजना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, कृषी कर्जमाफी इत्यादींबाबत खोटी आणि खळबळजनक माहिती पसरवत आहेत आणि यात खोट्या बातम्यांचा समावेश आहे . उदाहरणार्थ, सर्वोच्च न्यायालय आदेश देणार आहे की भविष्यातील निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातील; बँक खाती, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असलेल्या लोकांना सरकार पैसे देत आहे; ईव्हीएमवर बंदी, इत्यादी खोट्या आशयांच्या बातम्यांचा यात समावेश आहे.
युट्युब चॅनेल्स टीव्ही चॅनेलचे बनावट लोगो, आक्षेपार्ह थंबनेल (thumbnails) आणि तर काही प्रसिद्ध वृत्तनिवेदकांचे फोटो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे, जेणेकरून प्रेक्षकांना विश्वास वाटेल की त्यांच्या बातम्या खऱ्या आहेत. ही चॅनेल्स त्यांच्या व्हिडिओंवर जाहिराती दाखवून आणि युट्यूबवर खोट्या बातम्या देऊन कमाई करत असल्याचेही आढळून आले. फॅक्ट चेक विभागाने केलेल्या कारवाईनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक युट्युब चॅनेल्स बंद केली आहेत.
Join Our WhatsApp Community