खोटी, आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या YouTube चॅनेल्सवर केंद्र सरकारची कारवाई

104

भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा युट्यूब वाहिन्यांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या युट्यूब वाहिन्यांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी १०० हून अधिक वाहिन्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर पीआयबीने सहा वेगवेगळ्या ट्विटची मालिका फॅक्ट चेक कक्षाने जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाची ही दुसरी कारवाई आहे या कारवाईच्या माध्यमातून युट्यूब वाहिन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

( हेही वाचा : रेल्वे अपघातात वर्षभरात 2 हजारांहून अधिक मृत्यू; रेल्वेने जाहीर केली आकडेवारी)

या सहा युट्युब वाहिन्या एका समन्वित अपप्रचार नेटवर्कचा भाग म्हणून कार्यरत असल्याचे आढळले, या वाहिन्यांची सदस्यसंख्या जवळपास 20 लाख होती आणि त्यांच्या चित्रफिती 51 कोटींहून अधिक वेळा पाहिल्या गेल्या आहेत. पीयआयबीद्वारे तथ्य -तपासणी केलेल्या या यूट्युब वाहिन्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

No. Name of YouTube Channel Subscribers Views
1 Nation Tv 5.57 Lakh 21,09,87,523
2 Samvaad Tv 10.9 Lakh 17,31,51,998
3 Sarokar Bharat 21.1 thousand 45,00,971
4 Nation 24 25.4 thousand 43,37,729
5 Swarnim Bharat 6.07 thousand 10,13,013
6 Samvaad Samachar 3.48 Lakh 11,93,05,103
Total 20.47 Lakh 51,32,96,337

पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने कारवाई केलेल्या या यूट्यूब वाहिन्यांनी निवडणुका, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या संसदेतील कार्यवाही, भारत सरकारचे कामकाज इत्यादींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील बंदीबाबत खोटे दावे आणि भारताचे माननीय राष्ट्रपती, भारताचे माननीय सरन्यायाधीश यांच्यासह वरिष्ठ घटनात्मक अधिकाऱ्यांची बनावट विधाने दाखवणे याचा यात समावेश आहे.

बनावट बातम्यांच्या आधारावर कमाई करणाऱ्या या वाहिन्या बनावट बातम्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत . प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आणि या बातम्या खऱ्या आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसावा तसेच कमाई करण्याच्या दृष्टीने, या वाहिन्यांद्वारे प्रसारित चित्रफितीच्या माध्यमातून, वाहिनीवर प्रेक्षक संख्या वाढावी यासाठी या वाहिन्या बनावट, क्लिकबेट, लघुप्रतिमा (थंबनेल) आणि दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्त निवेदकाच्या प्रतिमा वापरत होत्या. पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने केलेली ही दुसरी कारवाई आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.