११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! तब्बल ७८ दिवसांचा पगार बोनस देणार, ट्विटरद्वारे माहिती

151

दिवाळी जवळ आली की सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असते ती म्हणजे बोनस केव्हा होणार? मात्र केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा दसऱ्याआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. रेल्वेने अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (RPF/RPSF कर्मचारी वगळून) ७८ दिवसांच्या पगारासमान बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास देशभरातील ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : अकरावी प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)

७८ दिवसांचा पगार बोनस 

केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना सन २०२१-२०२२ सालासाठी देण्यात येणारा प्रोडक्शन लिक्ड बोनस म्हणजेच पीएलबी देण्यात येण्यात आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना जवळपास तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिल्यामुळे भारतीय रेल्वेवर दोन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना काळात सुद्धा रेल्वेने सेवा दिली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस प्रोत्साहन कामासाठी दिला जातो. ७८ दिवसांनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून १७ हजार ९५१ रुपये दिले जातील. यासाठी रेल्वेवर १ हजार ८३२.०९ कोटी इतका बोजा पडणार आहे. बोनसची घोषणा रेल्वे मंत्रालयाने ट्वीटरवर केली आहे, यामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा खुशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार २८ सप्टेंबर रोजी महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांसमवेत पेन्शनधारकांनाही होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. ३८ टक्के डीए झाल्यावर कर्मचाऱ्यांना ६ हजार ८४० रुपये डीए मिळेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.