केंद्र सरकारने आरोग्यासाठी घातक असलेल्या 14 औषधांवर बंदी (Drugs banned) घातली आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने नवा निर्णय जारी करत 14 औषधांवर कायमची बंदी घातली आहे.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनच्या औषधांचा (Drugs banned) संबंधित रोगांवर परिणामकता कमी आणि धोकाच जास्त आढळून आल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता देशात एफडीसी कॉम्बिनेशन औषधं विक्री करण्याच्या घटना समोर आल्यास आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतर एफडीसी कॉम्बिनेशन औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर आता या औषधांची विक्री करणं गुन्हा असल्याने औषध व प्रशासन विभाग सतर्क झाला आहे.
(हेही वाचा – ट्विटरची कारवाई! २५ लाख भारतीय अकाऊंटवर घातली बंदी)
एफडीसी कॉम्बिनेशन औषधे (Drugs banned) मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा निर्वाळा काही दिवसांपूर्वीच डीजीसीआयच्या तज्ज्ञ समितीने दिला होता. त्यानंतर औषध मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठवला. सरकारने या निर्णयाला संमती दिल्यानंतर डीजीसीआयने 14 प्रकारच्या औषधांवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता देशात फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. एका गोळीत एकापेक्षा जास्त गोळ्यांची पॉवर असते, अशा गोळ्यांना कॉकटेल गोळ्या म्हटले जाते. अशा 14 प्रकारची औषधे आणि गोळ्यांवर मोदी सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
डीजीसीआयच्या नव्या अधिसूचनेनुसार, भारतात बंदी घालण्यात आलेल्या 14 प्रकारच्या औषधांचे (Drugs banned) उत्पादन, विक्री तसेच वितरण गुन्हा मानला जाणार आहे. तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने संशोधन केल्यानंतर ही औषधे मानवाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळं आता रुग्णांना कोणत्याही आजारांवर एकावेळी एकाच प्रकारचं औषध घ्यावं लागणार आहे. तसेच फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनच्या औषधांवर बंदी घालण्यात आल्याने त्याची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती डीजीसीआयने दिली आहे.
Join Our WhatsApp Community