मोबाईलवर Unknown क्रमांक नाही, थेट दिसेल फोन करणाऱ्याचे नाव! गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक असून आपण बरीच कामे अगदी सहज करू शकतो. ऑनलाईन व्यवहार, बॅंकांसबंधित कामे अलिकडे नागरिक मोबाईलवर करतात परंतु फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक लोक मोबाईलच्या माध्यामातून संपर्क करून अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉल करून लोकांना लुटले जाते. सर्वाधिक फसवणूक ज्येष्ठ नागरिकांची केली जाते. अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; १८ नोव्हेंबरला ईडीकडून पुन्हा चौकशी)

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता यापुढे फोनवर Unknown क्रमांक न दिसता थेट फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे. Unknown क्रमांकावरून फोन करणाऱ्याचे नाव पोलिसांना यापुढे सहज उपलब्ध होईल.

केंद्र सरकारचा नवा नियम

कॉल करणाऱ्या माणसाचे थेट नाव मोबाईलवर दिसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असणार आहे त्याच व्यक्तीचे नाव मोबाईल स्क्रिनवर दिसणार आहे. असे दूरसंचार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे दूरसंचार विभागाच्या या नव्या निर्णयामुळे नागरिकांना कोणत्याही अ‍ॅप शिवाय ही सुविधा मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दिसेल आणि नागरिकांची फसवणूक होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here