दिल्लीतील झोपडपट्टीधारकांना आता पक्की घरे मिळणार आहेत. सुमारे 50 लाख झोपडपट्टीधारकांना त्यांच्या झोपड्यांच्या जागी पक्की घरे देणार असल्याची घोषणा केंद्रीय दारिद्र्य निर्मूलन आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. दिल्लीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
( हेही वाचा : मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण!)
यावेळी पुरी म्हणाले की, राष्ट्रीय राजधानीच्या पुनर्विकासामुळे १ कोटी 35 लाखांहून अधिक लोकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच कालकाजी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या 3 हजारांहून अधिक सदनिकांच्या चाव्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात सुपूर्द केल्या. जेलरवाला बागेतही एक प्रकल्प असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. याशिवाय कठपुतली कॉलनी आणि इतर काही प्रकल्प आहेत, असे त्यांनी सांगितले.
देशातील 2011 च्या जनगणनेनुसार दिल्लीची लोकसंख्या 1.67 कोटी मानली जात होती. आता पुढची जनगणना होईल तेव्हा दिल्लीची लोकसंख्या 2 कोटींहून अधिक असेल. आमच्या योजना ज्यात “झुग्गी वही मकान” अंतर्गत 10 लाख लाभार्थी असतील. एमसीडीच्या भाजपच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देताना पुरी म्हणाले की, आम्ही जाहीरनाम्यात काही आकडे देखील दिले आहेत. अनियंत्रित वसाहतींमध्ये ‘पीएम उदय’ योजनेअंतर्गत 50 लाख नागरिकांना लाभ मिळणार आहे. ‘जहां झुग्गी-वहान मकान’ योजनेचे सुमारे 10 लाख लाभार्थी असतील. लँड पूलिंग योजनेंतर्गत 75 लाख लाभार्थी असतील. एकूणच, दिल्लीच्या सुमारे 2 कोटी लोकसंख्येपैकी 1 कोटी 35 लाख नागरिक पुनर्विकासाचा लाभ घेतील. सध्या दिल्लीत 675 क्लस्टर आहेत. यापैकी 376 क्लस्टर किंवा 172 हजार घरे डीडीए आणि केंद्र सरकारच्या जमिनीवर आहेत. त्यापैकी 210 मध्ये आम्ही काम पूर्ण केले आहे. लोकांकडून फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पुरी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community