सोने खरेदी करणा-यांसाठी धोक्याची घंटा, केंद्र सरकार लावू शकते ‘हा’ कर

97

भारतीयांना सोन्याचे आकर्षण हे फार पूर्वीपासून आहे. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराई आणि इतर शुभ कार्यांसाठी, वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांच्या दिवशी सोने खरेदासीठी लोकांच्या रांगा लागतात. इतकंच नाही तर अडीअडचणीच्या काळात एक सुरक्षित धन म्हणून देखील सोने खरेदी केले जाते.

पण याच सोन्यातील गुंतवणुकीवर आता सरकारचा डोळा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच सोन्याच्या गुंतवणुकीवरही सरकार कर लावणार असल्याची मााहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः आता ‘या’ कामांसाठी Birth Certificate अनिवार्य होणार, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय)

केंद्र सरकारचा विचार

सोने आणि इतर काही मालमत्तेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकारकडून कॅपिटल गेन टॅक्स लावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी सरकारकडून विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कॅपिटल गेन टॅक्सच्या दरांबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही मालमत्तांचे सरकारकडून पुनर्वर्गीकरण करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न

केंद्र सरकार याबाबत लवकरच नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. येत्या अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्सच्या रचनेत सरकारकडून बदल केले जाऊ शकतात. आर्थिक महसुलात वाढ करण्यासाठी तसेच विविध योजनांसाठी लागणारा खर्च वाढवण्यासाठी सरकारकडून सोन्यावरील गुंतवणुकीवर कर लावण्यात येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.