मोदी सरकारने देशातील गरीब गरजूंसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मोदी सरकारकडून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणा-या रेशन कार्डधारकांना डिसेंबरपर्यंत मोफत रेशनचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गरीब गरजूंसाठी ही आनंदाची बातमी आहे.
डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
कोविड काळात एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण योजना(PMGKAY) सुरू करण्यात आली होती. 2022 पर्यंत ही योजना सुरू ठेवण्यात आल्यानंतर मार्च 2022 मध्ये या योजनेला सहा महिने म्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
(हेही वाचाः केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला)
80 कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ
या योजनेचा तब्बल 80 कोटी लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही ही योजना वाढवण्यासंदर्भात संकेत दिले होते. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना असल्याचे सांगण्यात येते.
आतापर्यंत या योजनेवर केंद्र सरकारकडून 3.40 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वच गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना दर महिन्याला प्रति कुटुंब 5 किलो रेशन मोफत दिले जाते.
Join Our WhatsApp Community