Social Media Influencers साठी केंद्राने जारी केली नवी नियमावली; नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांचा दंड

156

सोशल मीडियावरील दिशाभूल करणा-या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणा-यांना 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सुरुवातीला दिशाभूल करणा-या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच, पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.

( हेही वाचा: ‘या’ 21 ‘परमवीर’ सैनिकांच्या नावाने ओळखली जाणार अंदमान- निकोबारमधील बेटे )

गेल्या काही वर्षांत स्वतंत्र मीडियाच्या रुपाने सोशल मीडिया स्टार्स आणि रिपोर्टर्सची संख्या वाढली आहे. त्यात फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूबर सशुल्क उत्पादनांचा प्रचार करण्याचे काम करतात. हे टाळण्यासाठी सरकारकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

काय आहेत सरकारचे नवे नियम?

  • केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
  • सोशल मीडियावर सशुल्क सामग्री पोस्ट करणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे केंद्राने म्हटले आहे. अशा प्रकारे सशुल्क पोस्ट करणा-यांना 50 लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
  • सुरुवातीला दिशाभूल करणा-या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच, पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.
  • नवीन नियमानुसार, सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर कोणत्याही पेड आर्टिकलवर डिस्क्लेमर द्यावा लागणार आहे. दिशाभूल करणा-या पोस्टमधून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी सरकारने ही नवीन नियमावली आणली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.