सावधान! कोरोना वाढतोय… केंद्राकडून ‘या’ 8 राज्यांना विशेष निर्देश!

85

देशभरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांना लसीकरण वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आठ राज्यांना निर्देश

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड यांना पत्र लिहून कोरोना चाचण्या वाढवण्याचा, रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करण्याचा, लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने या राज्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

( हेही वाचा : १५ ते १८ वयोगटातील मुलांना ‘ही’ देणार लस! )

ओमायक्रॉनची धास्ती

मृत्यूदर वाढू नये यासाठी केंद्राने कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने या राज्यांना सांगितले की, दिल्लीत लागू करण्यात आलेले जीआरएपी मॉडेल संपूर्ण देशात नेण्याचा विचार केला जात आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे संसर्गाचा वेग वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. यामध्ये २६३ रुग्णांसह दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, तर २५२ रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.