प्रत्येकाच्या घरात घड्याळ, रिमोट आणि छोट्या-मोठ्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बॅटरी किंवा सेल यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मूर्ती लहान असली तरी सेलची कीर्ती खूप महान आहे. सेलची बॅटरी संपली की ते आपण टाकून देतो. पण या बॅट-या आता बॅटरी तयार करणा-या कंपन्या खरेदी करणार आहेत. केंद्र सरकारकडून तशी अधिसूचना देखील काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून बॅटरी उत्पादक कंपन्यांना कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पर्यावरण,वने आणि हवामान मंत्रालयाने अधिसूचना देखील जारी केली आहे. त्यामुळे बॅटरी उत्पादक कंपन्या ग्राहकांकडून सदोष बॅटरी परत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः सप्टेंबर नंतर क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी द्यावा लागणार ‘हा’ नंबर, RBI चा निर्णय)
बॅटरी बायबॅकची योजना
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा जास्त झाल्याने त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी बॅटरी कंपन्यांना देखील या कचरा व्यवस्थापनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बॅटरी कंपन्या ग्राहकांकडून बॅटरी बायबॅक(Battery Buyback) आणि डिपॉझिट रिफंडसारख्या याेजना सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांकडील सदोष बॅटरी कंपन्यांना परत करता येणार आहेत.
वस्तू होणार स्वस्त
केंद्र सरकारकडून Circular Economy वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याद्वारे उत्पादनासाठी लागणारे निरुपयोगी सामान कमी करण्यासाठी वस्तूंचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल तयार होणार असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमतही कमी होणार आहे. या पुनर्वापरासाठी अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार एक समिती करणार असून हे आदेश न पाळणा-या कंपन्यांवर समितीकडून दंड आकारण्यात येणार आहे.
(हेही वाचाः 7th Pay Commission: नवरात्रीतच सरकारी कर्मचा-यांची होणार दिवाळी? महागाई भत्ता वाढण्याची शक्यता)
Join Our WhatsApp Community