केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता आधार कार्डला लिंक करावे लागणार व्होटिंग कार्ड! कधीपासून होणार नियम लागू?

94

आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगनंतर आता केंद्र सरकारकडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. आता नागरिकांना आपले मतदान ओळखपत्र(Voter ID)देखील आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून हा नवीन बदल लागू करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय कायदे मंत्रालयाने याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. निवडणूक सुधारणा कायदे हे येत्या 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करणे हे ऐच्छिक असले तरी ते न जोडण्याची कारणे सांगावी लागणार आहेत. डबल व्होटिंगसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः आधार कार्डला कसे लिंक कराल व्होटिंग कार्ड? केंद्र सरकारचा नवा नियम)

(हेही वाचाः EPFO: PF चे व्याज अकाऊंटला जमा झाले की नाही? असा चेक करा बॅलेन्स)

काय आहे नवा नियम?

या नव्या नियमांनुसार, 1 एप्रिल 2023 पर्यंत ज्या नागरिकांची नावे निवडणूक आयोगाच्या यादीत समाविष्ट असतील, त्यांना त्यांचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाला सांगावा लागणार आहे. यासाठी फॉर्म 6B भरावा लागणार आहे. ज्यांना आधार कार्डशी मतदान ओळखपत्र लिंक करायचे नसेल किंवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना तसे कारण लिहून द्यावे लागणार आहे. अशा मतदारांना आपल्याजवळील 11 पैकी कोणत्याही एका कागदपत्राने मतदार ओळखपत्र व्हेरिफाय करुन घ्यावे लागणार आहे.

या 11 कागदपत्रांचा समावेश

ज्या मतदारांना आधार कार्डला व्होटर आयडी कार्ड लिंक करायचे नाही त्यांना MGNREGS जॉब कार्ड, फोटो असलेले बँक पासबूक,ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन काईड,पासपोर्ट,हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड,पेन्शन प्रमाणपत्र,सरकारी सेवा ओळखपत्र,खासदार,आमदार किंवा विधान परिषद सदस्यांनी प्रमाणित केलेले ओळखपत्र,सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेले युनिक आयडी कार्ड या कागदपत्रांद्वारे आपले व्होटर आयडी कार्ड व्हेरिफाय करुन घ्यावे लागणार आहे.

(हेही वाचाः 1 जुलैपासून पगार आणि पीएफमध्ये होऊ शकतात मोठे बदल, केंद्र सरकारचे नवे कायदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.