67 पॉर्न वेबसाईट्स होणार ब्लॉक, केंद्र सरकारची मोठी कारवाई

136

पॉर्न वेबसाईट विरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 67 पॉर्न वेबसाईट्सवर केंद्र सरकारकडून गुरुवारी बंदी घालण्यात आली आहे. इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्यांना या वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

67 वेबसाईट्सवर बंदी

2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सरकारने 67 पॉर्न वेबसाईटवर ही कारवाई केली आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने पुणे न्यायालयाच्या आदेशानुसार 63 आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 पॉर्न वेबसाईटवर बंदी घातली आहे.

(हेही वाचाः कारमध्ये 6 एअरबॅग्स सक्तीच्या, नितीन गडकरींची घोषणा! ‘या’ तारखेपासून अंमलबजावणी)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्णय

24 सप्टेंबर रोजी दूरसंचार विभागाच्या माध्यमातून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या वेबसाईटवर अश्लील साहित्य असून त्यामुळे महिलांच्या विनयशीलतेचा भंग होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपन्यांना दिले आहेत.

IT नियमांतर्गत कारवाई

पॉर्न वेबसाईटवरील वाढत्या अश्लिलतेला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 2021 मध्ये नवीन IT नियम लागू केले होते. यामध्ये आक्षेपार्ह असलेल्या लैंगिक कृतींचे प्रसारण संग्रहित किंवा प्रकाशित करणा-या वेबसाईट्सवर बंदी घालणे बंधनकारक केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.