Modi Government: मोदी सरकार अदानी समुहाची चौकशी पुन्हा सुरू करणार

अदानी पॉवर कंपनी इंडोनेशियाकडून कोळसा खरेदी करून ग्राहकांना जादा दराने विकत होती.

165
Modi Government: मोदी सरकार अदानी समुहाची चौकशी पुन्हा सुरू करणार
Modi Government: मोदी सरकार अदानी समुहाची चौकशी पुन्हा सुरू करणार

केंद्र सरकार  गौतम अदानी समुहाच्या कोळसा आयात प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करू शकते. गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारताच्या तपास यंत्रणा गौतम अदानी समूहाच्या कोळशाच्या आयातीच्या किमती वाढवल्याच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करू शकतात. सिंगापूरमधून यासंदर्भातील कागदपत्रे गोळा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. गौतम अदानी समुहाच्या कंपन्यांवर आयात कोळशाच्या किमती वर्षानुवर्षे वाढवून गुजरात आणि महाराष्ट्रातील वीज कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation: प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन)

इंडोनेशियातील कोळशाच्या किमतीपेक्षा जास्त दराने कोळसा आयात केल्याची माहिती अदानी पॉवरने दिल्याचा आरोप गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडने केला होता. अदानी पॉवर कंपनी इंडोनेशियाकडून कोळसा खरेदी करून ग्राहकांना जादा दराने विकत होती. त्या तुलनेत कोळशाचा बाजारभाव खूपच कमी होता, असा आरोप अदानी कंपनीवर आहे.

याबाबत गौतम अदानी समुहाने म्हटले आहे की, या प्रकरणात कोणतीही अनियमितता नाही आणि भारतीय अधिकाऱ्यांनी बंदरातून कोळशाच्या शिपमेंटचे आणि त्यांच्या किमतीचे मूल्यांकन केले होते. भारत आणि सिंगापूरमध्ये ही कागदपत्रे उघड न करण्यासंबंधीची लढाई अदानी एंटरप्रायझेस आणि त्याच्या संलग्न कंपन्यांनी जिंकली होती.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.