देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर केंद्र सरकारने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर आता केंद्र सरकार तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे.
देशातील घरगुती वापरासाठी लागणा-या वस्तूंचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. देशातील जनतेसाठी लागणा-या खाद्य वस्तूंचा आवश्यक साठा नसल्याने केंद्र सरकारकडून खाद्य वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे.
(हेही वाचाः 2024 साठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू, असा आहे प्लॅन)
पाच वस्तूंवर निर्यातबंदी
त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार होत आहे. केंद्र सरकारने पाच महत्वाच्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणण्याचे ठरवले आहे. त्यापैकी गहू आणि साखर यांच्यावर बंदी घालण्यात आली असून, आता तांदूळ आणि इतर खाद्य वस्तूंवर बंदी आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
महागाई नियंत्रणासाठी प्रयत्न
बासमती तांदूळ वगळता इतर तांदळांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खाद्य वस्तूंच्या वाढत्या दरांवर लक्ष ठेवणा-या समितीकडून दर नियंत्रणात आणण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. त्यातूनच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः Income Tax भरताना आता ही माहिती सुद्धा द्यावी लागणार, आयकर विभागाचे नवे नियम)
तांदळाचा मोठा निर्यातदार भारत
जगातील तांदूळ निर्यातीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. भारताने 2021-22 मध्ये तब्बल 150 पेक्षा जास्त देशांना तांदूळ निर्यात केला आहे. यामध्ये भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीतून सर्वाधिक परकीय चलन कमावले आहे. पण परकीय चलनापेक्षाही देशातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्याकडे केंद्र सरकारकडून लक्ष देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community