Ranveer Allahbadia च्या वादग्रस्त विधानानंतर केंद्र सरकारने OTT Platform ला फटकारले

आयटी नियम २०२१ नुसार आचार संहितेचे पालन करण्यात यावे आणि सेल्फ रेग्युलेशनवर लक्ष देण्याबरोबरच ए ग्रेडचा कॉन्टेट मुलांनी बघू नये म्हणून अ‍ॅक्सेस कंट्रोल लागू करण्यात यावा, असेही केंद्राने निर्देश दिले आहेत.

123

रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) ने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ‘इंडियाज गॉट लेटेंट शो’ वादात सापडला आहे. त्यामुळे युट्यूब, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) मजकुरावरून वादविवाद सुरू झाला आहे. यासंदर्भात आता केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मना (OTT Platform) नोटीस पाठवली असून, आयटी नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

आयटी नियम २०२१ नुसार आचार संहितेचे पालन करण्यात यावे आणि सेल्फ रेग्युलेशनवर लक्ष देण्याबरोबरच ए ग्रेडचा कॉन्टेट मुलांनी बघू नये म्हणून अ‍ॅक्सेस कंट्रोल लागू करण्यात यावा, असेही केंद्राने निर्देश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्संनी (OTT Platform) असा कोणताही मजकूर दाखवू नये जो प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. जो कॉन्टेट आहे, त्याचे वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात यावे. नियमांनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म्संनी (OTT Platform) आचारसंहितेचं पालन होईल यासाठी स्वतःच्या समित्यांनी काळजी घेतली पाहिजे. प्लॅटफॉर्म्संवर कॉन्टेट प्रदर्शित करण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तयार करण्यात आलेल्या आचार संहितेतीतल नियमांचं उल्लंघन होणार नाही, हे बघायला हवे, असेही सरकारने म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.