सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ पदार्थांवर लागणार नाही जीएसटी

सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच महागाईच्या झळा पोहोचत आहेत. त्यामुळे आधीच जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने जीएसटीच्या कक्षेत नसणा-या गोष्टींवर जीएसटी आकारायचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामांन्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आता जनतेच्या रोषाची दखल घेत आता केंद्र सरकारने या वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

केंद्र सरकारकडून नुकताच सुट्या धान्य आणि खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची अंमलबजावणी 18 जुलैपासून करण्यात आली आहे. सुट्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी आता मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, पीएफवरील व्याज वाढवण्यावर होणार निर्णय)

या वस्तूंवरील जीएसटी रद्द

सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदुळ, पीठ, रवा, बेसन, दही आणि लस्सी यावर आता जीएसटी रद्द करण्यात आला असून, या पदार्थांवर आता जीएसटी लागणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सर्वसामांन्यांना दिलासा

जीएसटी परिषदेकडून 25 किलो वजनाच्या प्री-पॅकेज आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आला होता. त्यासोबतच अनेक खाद्यपदार्थांवरचा जीएसटी देखील वाढवण्यात आला आहे. यामुळे अनेक खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री लागली होती. त्यामुळे केंद्र सरकारने सुट्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here