सरकारी कर्मचा-यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

88

केंद्रातील मोदी सरकारकडून सातत्याने सरकारी कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचा-यांना मोदी सरकार मोठं गिफ्ट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या मूळ वेतनात भरघोस वाढ करण्याबाबत पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता

मोदी सरकारकडून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतनातील फिटमेंट फॅक्टरबाबत चर्चा होऊ शकते. मोदी सरकारकडून हे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय झाल्यास केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. हे फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 पर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः बँक खातेधारकांची अशी होत आहे फसवणूक, सरकारने दिला सावधानतेचा इशारा)

इतकी होऊ शकते वाढ

फिटमेंट फॅक्टर वाढवल्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचे मूळ वेतन कमालीचे वाढू शकते. ज्या केंद्रीय कर्मचा-याचा किमान पगार हा 18 हजार रुपये आहे, त्याला इतर भत्ते वगळून 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार(18,000*2.57) 46 हजार 260 रुपये इतका पगार मिळतो. पण हाच हिशोब जर 3.68 नुसार करण्यात आला तर केंद्रीय कर्मचा-यांचा पगार 95 हजार 680(18,000*3.68) रुपयांपर्यंत वाढू शकतो.

(हेही वाचाः पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फुटली, उड्डाणपुलाचे काम पूर्ण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.