9देशातील करोना संसर्गाची तिसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांनी अनेक निर्बंध उठवले आहेत. पण आता मात्र महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम या पाच राज्यांत पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यांना केंद्राने निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिवांचे पत्र
राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सतर्क केले आहे. राजेश भूषण यांनी पाचही राज्यांना पत्र लिहून बदलत असलेल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. त्याचा नियमित आढावा घेण्यात यावा. स्थितीवर बारीक लक्ष ठेवतानाच रुग्णवाढ रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावी, असे निर्देश राजेश भूषण यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
( हेही वाचा: ST Strike! आधी जल्लोष नंतर आक्रोश …कशासाठी? )
18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस
10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत देशातील 194 कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला 9 महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते कोरोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Join Our WhatsApp Community