अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करत केला. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य आणि उद्योगसमूहाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष महिला आणि तरुणांवर केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. देशांतर्गत क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी १० लाख (10 lakhs for higher education) रुपयांपर्यंतचे कर्ज, १ लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाउचर (E-voucher). याशिवाय २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Budget Session 2024)
(हेही वाचा – Budget 2024 : विरोधकांच्या बेरोजगारीच्या आरोपाला अर्थसंकल्पातून प्रत्युत्तर; नव्या रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद)
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, यात रोजगार, कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवली आहे, याचा देशातील ८० कोटी लोकांना फायदा होत आहे. अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकार नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या ३० लाख तरुणांना एका महिन्याचे पीएफ योगदान देऊन प्रोत्साहित करणार आहे. (Budget Session 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community