महागाई भत्ता वाढला, पण सरकारी कर्मचाऱ्यांवर येणार ‘ही’ बंधने! सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेले असतानाच आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वायफळ खर्चावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारी खर्चाने तिकीट बुक करण्यावर आता बंधने आणली आहेत. यानुसार विमान प्रवासाआधी 21 दिवस(तीन आठवडे) सरकारी कर्मचाऱ्यांना विमानाचे तिकीट बुक करावे लागणार आहे.

स्वस्त तिकीट करावे लागणार बुक

सरकारी खर्चाने प्रवास करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना आता विमानातील प्रवासासाठी सर्वात कमी खर्चाचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर येणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. तसेच आयत्यावेळी हे तिकीट बुक करता येणार नाही तर त्यासाठी तीन आठवडे आधी बुकिंग करून त्याबाबतची माहिती संबंधित विभागाला द्यावी लागणार आहे.

(हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता आधार कार्डला लिंक करावे लागणार व्होटिंग कार्ड! कधीपासून होणार नियम लागू?)

लेखी कारण द्यावे लागणार

यासोबतच इतरही काही नियम लागू करण्यात आले आहेत. जर तिकीट बुक केल्यानंतर प्रवासाच्या कमीत कमी 24 तास आधी ते रद्द करणे आवश्यक असणार आहे. प्रवासाच्या काही तास आधी जर तिकीट रद्द केले तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचे लेखी कारण द्यावे लागणार आहे.

ठराविक एजंटकडून करता येणार बुकींग

यासोबतच सरकारी कर्मचारी केवळ सरकारद्वारे सूचित करण्यात आलेल्या एजंटकडूनच विमानाचे तिकीट बुक करू शकतात. यामध्ये बामर लॉरी अँड कंपनी, अशोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि आयाआरसीटीसी या एजन्सीचा समावेश आहे.

(हेही वाचा: आधार कार्डला कसे लिंक कराल व्होटिंग कार्ड? केंद्र सरकारचा नवा नियम)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here