सरकारची भन्नाट योजना, वीज बिलात होणार 30 ते 50 टक्क्यांची बचत! वाचा संपूर्ण माहिती

109

वाढत्या महागाईमुळे खिशाला झळ बसत असतानाच, वीज बिलाच्या आकड्यांमुळे अनेकदा आपल्याला मोठा झटका बसतो. त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच हवालदिल झालेले पहायला मिळत आहेत. पण वीज बिल कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक विशेष योजना सुरु करण्यात आली आहे.

ज्या योजनेचा लाभ घेऊन आपण आपले वीज बिल नक्कीच कमी करू शकता. या योजनेंतर्गत घराच्या छतावर किंवा बिल्डिंगच्या टॅरेसवर सोलर पॅनल लावावे लागणार असून त्यासाठी सरकार देखील तुम्हाला मदत करणार आहे.

(हेही वाचाः सर्दी,खोकल्यासाठी औषधं घेताय? मग सावध रहा, देशात इतक्या अँटिबायोटिक्सना परवानगीच नाही)

सरकारची योजना

भारत सरकारच्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून सोलर रूफटॉप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून सबसिडी देण्यात येणार आहे. आपल्या वीजेच्या गरजेनुसार, आपल्याला सोलर पॅनलची क्षमता ठरवावी लागणार आहे.

2 ते 3 पंखे, एक रेफ्रिजरेटर 6 ते 8 एलइडी लाइट्स, एक पाण्याची मोटार आणि एक टीव्ही या उपकरणांसाठी दररोज 6 ते 8 युनिट वीजेची गरज भासते. त्यासाठी 2 किलोवॅट सोलर पॅनलची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने वीजेच्या गरजेनुसार आपल्याला सोलर पॅनल बसवावे लागणार आहेत. 1 किलोवॅट ऊर्जेसाठी साधारणपणे 110 वर्ग फूट जागेची गरज आहे.

(हेही वाचाः ‘…तर पुढील आषाढीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेचा मान देऊ’, पंढरपुरातील नागरिकांचा सरकारला इशारा! काय आहे कारण?)

अशी मिळते सबसिडी

घरगुती उपयोगासाठी केंद्र सरकारकडून 3kW पर्यंतच्या सोलर प्लांटवर 40 टक्के आणि 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंतच्या सोलार प्लांटवर 20 टक्के सबसिडी देण्यात येते. तसेच हाउसिंग सोसायटींसाठी केंद्र सरकारद्वारे 500 किलोवॅट पर्यंतच्या सोलार प्लांटवर 20 टक्के सबसिडी मिळते.

असा होणार फायदा

या सोलार प्लांटसाठी आपल्याला एकदाच खर्च करावा लागणार आहे. पण दीर्घ काळापर्यंत वीज बिलात बचत करता येणार आहे. या प्लांटमुळे वीजेवर होणा-या खर्चात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. त्यामुळे भांडवलाची पूर्ण वसुली वीजेच्या बिलात होणा-या बचतीमधून 5 ते 6 वर्षांमध्ये करता येणे शक्य असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. या योजनेची संपूर्ण माहिती solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.