MBBS : महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा – डाॅ. भारती पवार

या निर्णयाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ही मान्यता दिली आहे.

274
MBBS : महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा - डाॅ. भारती पवार

सन २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे (MBBS) प्रथम शैक्षणिक वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. २०१९-२० या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा.भारती पवार यांना भेटून यासंदर्भात विनंती केली होती.

(हेही वाचा – Vice President : भारताच्या राज्यकारभाराची पद्धत संपूर्ण जगाला हेवा वाटणारी – उपराष्ट्रपती जगदीप धनखड)

कोविड विषयक तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन डॅा.भारती पवार (MBBS) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या बाबत विस्तृत चर्चा करून या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली आहे.

या विद्यार्थ्यांना (MBBS) आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र २०१९-२० या काळात कोविड-१९ या आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती, त्यामुळे या काळातील एमबीबीएस चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता.यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून द्यावी, अशी भूमिका भारती पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे मांडली.

हेही पहा – 

याविषयी आयोगाने चर्चा केली आणि डॅा.भारती पवार (MBBS) यांच्या भूमिकेला मान्यता देत या विध्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला . या निर्णयाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ही मान्यता दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.