चीनसह अन्य देशांत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याबरोबरच बुस्टर डोससह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे, असे मांडविया यांनी सांगितले.
( हेही वाचा: धारावी सेक्टर 5 पुनर्विकास कृती समितीचा म्हाडावर धडक मोर्चा )
गर्दीच्या ठिकाणी मास्कच्या वापराचा आग्रह
चीनसह अन्य देशांतून येणा-या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचे, आरोग्य विभागाच्या एका अधिका-याने सांगितले. देशातील 27-28 टक्के पात्र नागरिकांनी कोरोनाचा बुस्टर डोस घेतला आहे, याकडे नीती आयोगाचे सदस्य डाॅक्टर व्ही के पाॅल यांनी बैठकीतील उपस्थितांची लक्ष वेधले. गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्तीचा आग्रह त्यांनी धरला. गर्दीच्या ठिकाणी मास्कच्या वापराचा आग्रह त्यांनी धरला. देशात सध्या कोरोनाचे 3 हजार 408 उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community