2022 मध्येही ओमायक्रोनचा विस्फोट? थर्टी फस्टपासून सुरुवात

114

ओमायक्रॅान या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सध्या जग भीतीच्या सावटाखाली जगत आहे. ओमायक्रॅानने जगभर धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॅान बाधित रुग्णंच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-19 रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पत्र लिहून जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये ओमायक्रोनची रुग्णसंख्या प्रचंड वाढण्याची शक्यताही केंद्राने वर्तवली आहे.

या आहेत सूचना

ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे केंद्राने राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.  कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण घालण्यास सांगितले आहे.

ठाकरेंची मागणी

मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील  केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर  पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली आहे.  तसेच  15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबात निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 

काल दिवसत्ररात राज्यात तब्बल 11 ओमायक्रॅान बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच ओमायक्रॅान  बाधित रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे. तसेच देशभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे.

 ( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती ‘या’ आमदाराची ८ तास चौकशी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.