प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार काम बंद आंदोलन पुकारूनही वरिष्ठांकडून निराशाच पदरी पडत असल्याने राज्यातील सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. दोन महिन्यांपूर्वी काम बंद आंदोलन पुकारूनही मान्य न झाल्याचे सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले.
राज्यातील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दिवसरात्र रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अद्यापही मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत. निवासी डॉक्टरांची वसतिगृहे, जेवणासाठीचे आवश्यक मेस आदींचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. परिणामी निवासी डॉक्टरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. निवासी डॉक्टरांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पूर्ण सेवेला अजून चांगल्या पद्धतीने हातभार लागेल, अशी माहिती सेंट्रल मार्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिली.
(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule : अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल – चंद्रशेखर बावनकुळे)
सद्यस्थितीत मुंबईतील भायखळामधील जे जे रुग्णालयातील वस्तीगृह वगळता अन्य कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयातील वसतीगृह उभारणी आणि डागडुजीसाठी निधी वितरित झाला नाही. बऱ्याच वसतिगृहांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. यामुळे राज्यातील सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याची खंत निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड या संघटनेने व्यक्त केली.
निवासी डॉक्टरांच्या वेतनातील थकबाकी अद्यापही बऱ्याचशा महाविद्यालयांमधील डॉक्टरांना मिळालेला नाही. सरकारकडून रुग्ण सेवा बजावताना निवासी डॉक्टरांना परीक्षेची हमी देण्यात आली होती. निवासी डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टर मानसिक तणावात येत असून या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्यतेने पहावे, ही विनंती सेंट्रल मार्ड संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community