99 वर साप चावेल आणि पुन्हा शून्यावर याल; मंत्री ललन सिंह यांनी Congress ची उडवली खिल्ली

122

सध्या संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. त्यावर कॉँग्रेसवर टीका करताना केंद्रीय मंत्री ललन सिंह यांनी साप शिडीच्या खेळाचा संदर्भ देत कॉँग्रेसची (Congress) खिल्ली उडवली. सध्या तुमचे 99 खासदार आहेत. पुढील पाच वर्षानंतर 99 वर तुम्हाला साप चावेल आणि तुम्ही शून्यावर याल, असे म्हटले.

जेडीयू आणि टीडीपीला 5 वर्षांसाठी जनादेश मिळाला आहे. अनेक पक्ष म्हणाले की, दोन राज्यांना खुश करण्यात आले आहे. हे कसले बोलणे आहे की, सरकार वाचवणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही तर तुम्हालाही बघितले आहे. आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार करून इकडे आलो. या लोकांना सत्य आवडत नाही, म्हणून ते (Congress) गोंधळ घालत आहेत, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

(हेही वाचा श्याम मानव यांची चौकशी करा; मंत्री Sudhir Mungantiwar यांची मागणी)

गेल्या तीन दिवसांपासून अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधक विषयांतर करत केवळ मोदीजींवर टीका करत आहेत. त्यांचा भाषणाचा रोख सांगतो की, त्यांना (Congress) नरेंद्र मोदी यांचा चेहराच पसंत येत नाही. मात्र आपण तरी काय करू शकता. देशातील जनतेने त्यांच्या नावावर मतदान केले आहे. हे पंतप्रधान मोदींचे यश आहे की, 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या नेत्याला तिसऱ्यांदा सत्ता सांभाळण्याची संधी मिळाली. आमचा एक सल्ला आहे की, सत्य जेवढ्या लवकर स्वीकाराल तेवढे चांगले आहे, असे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.