मध्य रेल्वे मार्गावर दिनांक २४ आणि २५ डिसेंबर २०२२ रोजी कल्याण – कसारा सेक्शनवर विविध पायाभूत कामांसाठी विशेष एकात्मिक रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम व मध्य रेल्वेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! )
मेगाब्लॉक वेळापत्रक…
- कसारा- खर्डी अप मार्गावर ००.३० ते ०३.४५ पर्यंत.
- वासिंद – आटगाव अप आणि डाउन मार्गावर ०२.२० ते ०४.२० पर्यंत.
- खडवली – आसनगाव अप आणि डाउन मार्गावर ०२.०५ ते ०५.०५ पर्यंत.
- खडवली-आंबिवली अप मार्गावर ०१.४० ते ०४.४० पर्यंत.
या ब्लॉकमुळे लोकलवर होणार परिणाम
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.५० वाजता सुटणारी कसारा लोकल आटगाव स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१४ वाजता सुटणारी कसारा लोकल आणि कसारा येथून ०३.५१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस खडवली ते कसारा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल.
- गाडी क्रमांक11402 आदिलाबाद- मुंबई एक्सप्रेस कसारा ते खडवली दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल.
एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार…
खालील गाड्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे ते १३० मिनिटे उशिराने पोहोचतील.
- ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस.
- ट्रेन क्रमांक 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस.
- ट्रेन क्रमांक 12106 गोंदिया- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस.
- ट्रेन क्रमांक 18030 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस.
- ट्रेन क्रमांक 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल (नागपूर मार्गे).
- ट्रेन क्रमांक 12152 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस.
- ट्रेन क्रमांक 17058 सिकंदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देवगिरी एक्सप्रेस.